spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Mumbai : महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी २० नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान पार पडले. तर आज २३ नोव्हेंबरला विधानसभेच्या मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी पार पडली असून या निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. तसेच एकूण २८८ मतदारसंघापैकी २२४ मतदारसंघात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार जिंकण्याच्या मार्गावर आहेत. तर असे दिसत आहे, महाविकास आघाडीला (MVA Alliance) अवघ्या ५८ जागांवर विजय मिळेल. हा माविआसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीमध्ये भाजप १३३, अजित पवार गटाला ३९ जागा तर शिंदे गटाला ५६ जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाला १९, काँग्रेसला २० आणि शरद पवार गटाला अवघ्या १५ जागा मिळाल्या आहेत. या दरम्यान, महायुतीला मुंबईतही मोठे यश मिळाले आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरात मिळून एकूण ३६ मतदासंघ आहेत.

यामध्ये आदित्य ठाकरे हे वरळीतून विजयी झाले आहेत. तर अमित ठाकरे यांचा माहीममध्ये दारुण पराभव झाला. या मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. हा राज ठाकरे यांच्यासाठी वैयक्तिकरित्या प्रचंड मोठा धक्का ठरला आहे. तर उद्धव ठाकरे यांनाही मुंबईतही मोठा धक्का बसला आहे. मोजके अपवाद वगळता ठाकरे गटातील मुंबईतील बहुतांश उमेदवारांचा पराभव झालेला आहे.

मुंबईमधील विजयी उमेदवारांची यादी…
१] मलबार हिल विधानसभा मतदारसंघ- मंगलप्रभात लोढा (भाजप)
२] बोरिवली विधानसभा मतदारसंघ- संजय उपाध्याय (भाजप)
३] वडाळा विधानसभा मतदारसंघ- कालिदास कोळंबकर (भाजप)
४] कुलाबा विधानसभा मतदारसंघ- राहुल नार्वेकर (भाजप)
५] वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ- आशिष शेलार (भाजप)
६] अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ- मुरजी पटेल (भाजप)
७] कांदिवली विधानसभा मतदारसंघ- अतुल भातखळकर (भाजप)
८] अणुशक्तीनुसार विधानसभा मतदारसंघ- सना मलिक (अजित पवार गट)
९] माहीम विधानसभा मतदारसंघ- महेश सावंत (ठाकरे गट)
१०] दहिसर विधानसभा मतदारसंघ- मनीषा चौधरी (भाजप)
११] वरळी विधानसभा मतदारसंघ- आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
१२] शिवडी विधानसभा मतदारसंघ- अजय चौधरी (ठाकरे गट)
१३] विक्रोळी विधानसभा मतदारसंघ- सुनील राऊत (ठाकरे गट)
१४] शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघ- अबू आझमी (समाजवादी पक्ष)
१५] कुर्ला विधानसभा मतदारसंघ- मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
१६] मुलुंड विधानसभा मतदारसंघ- मिहीर कोटेचा (भाजप)
१७] भायखळा विधानसभा मतदारसंघ- मनोज जामसुतकर (ठाकरे गट)
१८] चेंबूर विधानसभा मतदारसंघ- तुकाराम काते (शिंदे गट)
१९] कलिना विधानसभा मतदारसंघ– संजय पोतनीस (ठाकरे गट)
२०] वर्सोवा विधानसभा मतदारसंघ– हारुन खान (ठाकरे गट)
२१] जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ– अनंत नर (ठाकरे गट)
२२] अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ– अमित साटम (ठाकरे गट)
२३] मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ– अमिन पटेल (काँग्रेस)
२४] वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- वरुण सरदेसाई (ठाकरे गट)
२५] मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ– अस्लम शेख (काँग्रेस)
२६] दिंडोशी विधानसभा मतदारसंघ– सुनील प्रभू (ठाकरे गट)
२७] गोरेगाव विधानसभा मतदारसंघ– विद्या ठाकूर (भाजप)
२८] चारकोप विधानसभा मतदारसंघ– योगेश सागर (भाजप)
२९] मागाठाणे विधानसभा मतदारसंघ– प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
३०) घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदासंघ- रॅम कदम (भाजप)
३१] घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ- पराग शाह (भाजप)
३२] भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघ- अशोक पाटील (शिंदे गट)
३३] विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ- पराग अळवणी (भाजप)
३४] चांदिवली विधानसभा मतदारसंघ- दिलीप लांडे (शिंदे गट)
३५] सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ– तमिळ सेल्वन (भाजप)

हे ही वाचा:

कर्तव्य बजावण्यात पुण्याची जनता किती सरसावली? कुठल्या मतदारसंघात किती मतदान?। Pune Voting Percentage

Mahim मतदार संघात मध्ये नागरिकांनी दाखवला उत्स्फूर्त प्रतिसाद | Amit Thackeray Vs Sada Sarvanakr

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss