spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtra Vidhansabha Election 2024 : मनोज जरांगेचा मराठा बांधवांना महत्त्वाचं आवाहन; नेमकं कोणाला करायचं मतदान ?

आज २० नोव्हेंबर रोजी मतदानाला सुरुवात झाली असून, संपूर्ण राज्यभरात मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच सकाळी ७ वाजल्यापासून प्रत्येक नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बाजवताना दिसत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये मनोज जरांगे फॅक्टरविषयी चर्चा असतानाच मी आता काहीच दिवसांचा पाहून असल्याचं सांगणाऱ्या मनोज जरांगेनी मराठा समाजाला मतदानाबाबत नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं हे सांगितलं आहे. मनोज जरांगेने सांगितलं मराठा आरक्षणाला जे विरोध करतात त्याना सोडू नका. तुम्ही सर्व मालक आहात. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधलं नाही असे मनोज जरांगेने म्हंटल आहे. यादरम्यान मतदानाच्या दिवशी नेमकं कोणाला मतदान करायचं हे सांगत मनोज जरांगेनी मराठा बांधवांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. मराठा आरक्षण लढणाऱ्या मानोज जरांगेनी म्हंटल आहे की सर्वानी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, मतदानाचा अधिकार सर्वाना आहे. जे मराठा आरक्षणाला विरोध करतात त्या विरोधकांना सोडू नका. तुम्ही सर्व मालक आहात. तुम्हाला तुमच्या मनाने जे करायचं आहे ते करा. मतदान आपल्या लेकराच्या बाजून करायचं असं आवाहनही केलं आहे.

नेमकं मनोज जरांगे काय म्हणले?
विधानसभा निवडणुकांसाठी आज राज्यातील २७७ मतदारसंघातील मतदान होत आहे. या निवडणुकी दरम्यान मनोज जरांगे यांचा मराठवाड्यमधील मतदारसंघा मध्ये किती प्रभाव दिसेल यांची मोठी चर्चा असताना विधानसभा निवडणुकीसाठी नेमकं कोणाला मतदान करायचं याबाबत मनोज जरांगे म्हणाले आहे, तुमच्यासाठी हीच संधी आहे योग्य माणूस निवडण्याची, आपल्या लेकराच्या बाजूने आरक्षणाच्या बाजूने मतदान करा. जे मराठा आरक्षणाला विरोध करतात त्या विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुमच्या मानाने तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मालक तुम्ही आहेत. असं मनोज जरांगे यांनी म्हंटल आहे.

माझा पाठिंबा कोणालाच नाही
मनोज जरांगे यांनी असं म्हंटलं आहे की मी कोणाजवळ फोटो काढला असेल म्हणून मी त्याला पाठिंबा दिलेला नाही. मी टीम कुठीही पाठवली नाही, मी कुठेही मेसेज पाठवला नाही. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधले नाही. असं मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत मराठा बांधवांना मतदान करायला सांगितले आहे.

कालीचरण महाराज राजकीय दलात
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सभेत कालीचरण महाराज यांनी मनोज जरंगेयावर जोरदार टीका करत म्हंटल होत की, मनोज जरांगे याना जातीच्या आरक्षणाशी काहीही देणंघेणं नाही. मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला एक राक्षस आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं हिंदू समाजात फूट पाडल्याचा वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केल्यानंतर आता पुन्हा त्यांनी कालिचरण महाराजांवर हल्लाबोल केल्याचं दिसले आहे. कालीचरण महाराजांच्या केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘राजकीय दलाल आहे त्याला हिंदूंची गरज नाही हिंदूंच्या फोटोची गरज नाही. डबल बोला शंभर टक्के तो राजकीय नेत्यांच्या पाय चाटतो. त्यांनी पैसे घेतले आहेत, म्हणून बोलत आहे. त्याला हिंदू धर्माशी देणे घेणं नाही. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, सर्वांनी मतदान केलं पाहिजे…

नांदगावमध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार राडा; Suhas Kande यांनी कार्यकर्त्यांना दिली धमकी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss