spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Maharastra Politics : राजन साळवींनंतर आता ठाकरेंचा ‘हा’ नेता करणार जय महाराष्ट्र !

नुकताच ठाकरे गटाचे उपनेते व माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे.अशातच आता भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) चर्चेला उधाण आलं आहे.

Operation Tiger Bhaskar Jadhav : राजकीय घडामोडींमध्ये सध्या ऑपेरेशन टायगर ची जोरदार चर्चा सुरु आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. नुकताच ठाकरे गटाचे उपनेते व माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे.अशातच आता भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) चर्चेला उधाण आलं आहे.

संजय जाधव यांना योग्य संधी मिळाली नाही, आज माझा वाढतं वय आहे. मला दुःख आहे, योग्य वेळेला जर मला संधी मिळाली असती तर आज महाराष्ट्राला नावाप्रमाणे भास्कर दिसला असता, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सुचक इशारा दिला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी हा विचार करावा की त्याची आपल्याला खरंच गरज आहे का? आता तिकडे एसटी फुल झाली आहे तिथं आता तुम्हाला एका कोपऱ्यात जाऊन उभे राहायला लागणार आहे,त्यामुळे पक्ष सोडून जाणारे तिकडं का जात आहे? पलीकडे जाऊन काय फायदा आहे ? जे कोण पक्ष सोडून जात आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. ज्याच्याकडे दात आहेत त्याच्याकडे चणे नाहीत आणि ज्याच्याकडे चणे आहेत त्याच्याकडे दात नाहीत अशी परिस्थिती माझी झाली आहे, असं म्हणत भास्कर जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्याबद्दल उदय सामंत हल्ली खरोखरच चांगलं बोलत आहेत. उदय सामंत त्यांच्या मनामध्ये काय आहे? मला माहित नाही. पण ते आदराने वागत आहेत, असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढवल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, आज सर्व शिवसेना नेते एकत्र भेटणार आहोत, ज्या नेत्यांना काही खंत असेल तर बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काल आमची चर्चा झाली आहे, त्यानंतर आम्ही भेटणार आहोत. काही मुद्दे असतील त्यावर चर्चा करू, असं म्हणत संजय राऊत यांनी मुद्याला बगल दिली. राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायचे, ही बिरुदावली तुम्हाला लावावी का? हे राजन साळवींना विचारा, असा टोला यावेळी भास्कर जाधव यांनी लगावला होता. राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही, तिथे विरोध कोणी केला. त्याचप्रामणे भास्कर जाधव यांची उदय सामंत व शिवसेनेच्या नेत्यांशी वाढणारी जवळिक ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते.

हे ही वाचा:

WCD Maharashtra Recruitment: मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा, महिला-बालविकास’मध्ये पदभरती

Uday Samant: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात सुरु असलेल्या कोल्ड वॉर वर उदय सामंत स्पष्टच म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss