India Alliance ने मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बैठक दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ आणि दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ (गुरुवार आणि शुक्रवार) रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. तर आज बुधवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असून, त्यात बैठकीची माहिती दिली जाणार आहे. भाजपाविरोधात देशातील अनेक राजकीय पक्ष एकत्र आले असून त्यांनी इंडिया आघाडीअतंर्गत मोट बांधली आहे. या इंडिया आघाडीची बैठक उद्या म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे होणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील नेते मुंबईत होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती या माध्यमातून ठरवण्यात येणार आहे.
या बैठकीच्या वेळेस सहा राज्यांच्या बडे नेते देखील या वेळी उपस्थित होते. यावेळी बड्या नेत्यांकडून इंडिया च्या होणाऱ्या पार्शवभूमीवर हि बैठक घेण्यात आली आहे. India आघाडीची पत्रकार परिषद होत आहे. यादरम्यान देशभरातील अनेक विरोधी पक्षाचे नेते उपस्थित आहेत. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, नाना पटोले, आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित आहेत. या शिवाय राहुल गांधी. अखिलेश यादव, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक मोठे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकूण २८ पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी देशातील तानशाही आणि हुकूमशाही विरोधात आम्ही एकत्र येऊन लढणार आहोत आणि म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईला केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव आहे असे देखील या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे. प्रत्येक दिवस महिला सुरक्षेचा असला पाहिजे. असं शासन असलं पाहिजे. दुर्देवाने तसं शासन दिसत नाही. मी मधल्या काळात त्यावर भाष्य केलं होतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं होतं की, मुस्लिम महिलांकडून राखी बांधा. मी म्हटलं की, बिल्कीस बानोकडून सुरुवात करा, मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढली गेली, दिल्ली आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू महिलांना सुरक्षित वाटेल असं सरकार असायला हवं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही एकत्र आलो आहोत, कारण आम्हाला देशाची रक्षा करायची आहे. आम्ही तानाशाही, जुमलेबाजीच्या विरोधात आहोत”, असं ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर जे कोणी मुंबई वेगळे करू पाहत असेल त्यांना मी मुंबई वेगळे होऊ देणार नाही . असे त्यांनी ठाम पणे सांगितले. जागा वाटपाची चर्चा सुरु चालू झाल्या आहेत असे शरद पवार यांनी सांगितले आहे. वेळ अली कि आम्ही प्रत्येकावर विचारविनिमय करून जबाबदार हि सोपवली जाणार आहे. मुंबईच्या आगामी महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे असा प्रश्न विचारला गेला असता उद्धव ठाकरे यांनी याला नकार देत भाजप निवडणूक घेण्याचे धाडस करणार नाही असे दिसत आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत युती आहे जितकं खरा असला तरी प्रकाश आंबेडकरांनी मला अजून देखील महाविकास आघाडीचं निमंत्रण पोहोचलेलं नाही त्यामुळे नक्की आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत कि नाही या संदर्भात त्यांना अजून देखील स्पष्ट दिसत नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितले कि आमची युती हि २३ जानेवारीलाच स्पष्ट केली होती. आम्हाला एकदा त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांची तयारी असेल तर महावीसआघडीमध्ये आणि देशात INDIA मध्ये त्यांचे स्वागत असेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संयोजन समिती हि घेतली जाणार आहे का असा प्रश्न देखील पत्रकारांकडून केला गेले त्यावर शरद पवार यांनी सांगितले, आमचे विचार हे सारखेच आहे. त्यामुळे ककॊणताही अडथळा येणार नाही.
त्याचबरोबर अनेक दिवसांपासून प्रधानमंत्री पदासाठी अनेक लोक आहेत मात्र भाजपाकडे कोणी नाही असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मोदींनी आरोप न करता चौकशी करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सामना मधून अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे असा प्रश्न उद्धव ठरे यांनी विचारला त्यावर उद्धव ठाकरे म्हणले, आमचं वैशिष्ठ्य आहे कि, आमच्या सोबत असतो त्यांच्यावर आम्ही टीका करतो. त्यावर शरद पवार म्हणाले टीका केली म्हणजे काम करायचं थांबत नाही असे देखील शरद पावर म्हणाले.
हे ही वाचा:
राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती, जयंत पाटील यांनी सरकारला दिला इशारा
मेटा यूजरसाठी मार्क झुकेबर्गने आणले नवीन फिचर