spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

महिलांना फक्त इतक्या ‘रुपयांत’ मिळणार सिलेंडर, तब्बल ‘इतक्या’ सरकारी नोकऱ्या देणार, Mahavikas Aghadi जाहीरनाम्यात आणखी काय?

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच, आज (रविवार, १० नोव्हेंबर) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)  संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा (Mahavikas Aghadi Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे पत्रकार परिषदेत आज प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

  • महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात मिळणार
  • महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणणार
  • ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज,
  • नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर
  • सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरणार
  • एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती करणार
  • सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार
  • सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेणार
  • महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर भर
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करणार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवणार
  • शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करून २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss