Wednesday, April 24, 2024

Latest Posts

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला

लोकसभा निवडणुकीच्या सध्या राजकारणामध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता पक्षामध्ये जागांची चाचपणी सुद्धा केली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस याआधी लोकसभा निवडणुकीमध्ये लढलेल्या २२ जागांचा आढावा घेण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सध्या राजकारणामध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता पक्षामध्ये जागांची चाचपणी सुद्धा केली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस याआधी लोकसभा निवडणुकीमध्ये लढलेल्या २२ जागांचा आढावा घेण्यात येत आहे. ठाकरे गट दावा करत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये १८ ते १९ जागा जिंकणार आहोत. काँग्रेस पक्षाने सुद्धा लोकसभेच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन केले आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार? जागा वाटपामध्ये आघाडीत बिघाडी होणार का? असे सवाल उपस्थित होत आहेत.

महाविकास आघाडीच्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या तीनही पक्षांचा समावेश असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या २२ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत तयारीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे नेते दावे करत आहेत की ठाकरे गट १९ जिंकणार आहे. महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती लोकसभा निवडणुकी संदर्भातील जागा वाटपाचा निर्णय घेणार आहे असे सांगण्यात आले आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे की, लोकसभेच्या जागांसाठी काही ठिकाणी तडजोड करावी लागणार आहे त्यासाठी समन्वय साधून निर्णय घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील इतर महत्वाचे नेते सुद्धा समन्वय साधून जागावाटप करण्यात येणार आहे असे उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss