Maharashtra Vidhansabha Election 2024 : काल २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Vidhansabha) तिरंगी लढत आहे. तसेच मनसेकडून राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत हे रिंगणात उतरले. या तिरंगी निवडणुकीत अटीतटीची लढाई असल्याने तिन्हीही प्रमुख उमेदवारांकडून मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. यामुळे सकाळपासून येथे मतदान केंद्रावर मतदारांचे प्रमाण समाधानकारक दिसून आले. तसेच कालच्या निवडणुकीत माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्याचे देखील समोर आले आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५२.६७ टक्के मतदान झाले होते. आता विधानसभा निवणूक २०२४ च्या माहीममध्ये ५८ टक्के मतदान झालं आहे. मतदानाचा टक्का २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का ५.३३ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे आता सर्वांचे या गोष्टीकडे लक्ष लागले आहे की, माहीममध्ये यंदा वाढलेला हा मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार. अमित ठाकरे यांचे माहीम विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट वाचले तरी खूप मोठी गोष्ट आहे, असे सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. अमित ठाकरेंनी असा दावाही केला आहे की, मी दाव्याने सांगतो, मनसेशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही. मी अनेक लोकांपर्यंत पोहचलो आहे. मी माझा प्रचार डोअर टू डोअर केला. मी लोकांपर्यंत मला जे करायचं आहे ते पोहचवलं आहे, असं अमित ठाकरे यांनी सांगितले आहे.
मनसेला २ ते ४ जागा मिळण्याची शक्यता
विधानसभा निवडणूक पोलच्या अंदाजानुसार महायुतीला १२५ ते १४० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १३५ ते १५० जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर २ ते ४ जागा मनसेला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे एक-एक जागा महत्त्वाची असणार आहे. मनसेला २ ते ४ जागा मिळाल्यास राज ठाकरे भाजपाला पाठिंबा देत महायुतीला साथ देण्याची शक्यता आहे. तसेच मनसेने जिंकलेल्या २ ते ४ जागा निर्णायक ठरण्याची शक्यताही आहे. निवडणुकीच्या दुपारच्या सत्रानंतर मतदान काहीस वाढलेलं दिसलं. निवडणुकीच्या दिवशी संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान सर्वाधिक मतदान झालं. अंतिम आकडेवारीनुसार, मुंबईत ५६ टक्के मतदान झालं. यात सर्वाधिक भांडूप पश्चिम मतदारसंघात ६२ टक्के मतदान झाले असून मुलुंड आणि बोरीवलीमध्येही ६१ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच सर्वात कमी ४८ टक्के मतदान चांदिवलीमध्ये झालं आहे. कुलाब्यात सर्वात कमी ४५ टक्के मतदान झाल, तर वडाळा मतदारसंघात सार्वधिक ५८ टक्के मतदान झाले आहे.
हे ही वाचा:
मोठी बातमी! १० वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर