काँग्रेस पक्षाने (Congress) जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व ११ वर्ष पंतप्रधानपदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले याचा हिशोब द्यावा असे आव्हान दिले.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, “कर्नाटकात गृहज्योती योजनेअंतर्गत २०० युनिट वीज मोफत दिली जात असून त्यासाठी ९६५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातील आतापर्यंत ५१६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासासाठी ५०१५ कोटी रुपयांची तरतूद केली असून २१०९ कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. गृहलक्ष्मी योजनेसाठी महिलांना प्रति महिना २००० रुपये दिले जात असून २८ हजार ६०८ कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतुद केलेली आहे. या योजनेवर आतापर्यंत १३ हजार ४५१ कोटी खर्च झाले आहेत. अन्नभाग्य योजनेसाठी बीपीएल कुटुंबासटी ८०८० कोटींची तरतूद केली असून यातून २५८२ कोटी खर्च केले आहेत, बेरोजगार तरुणांसाठी युवानिधी योजनेअर्तंगत ६५० कोटी तरतूद आहे, त्यातून १०८ कोटी खर्च केले आहेत. पंतप्रधान मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे काही यंत्रणा नाही का, काहीही न पाहता, कोणतीही माहिती न घेता ते सर्रास खोटे बोलत आहेत.”
“भाजपाचे नेते भडकाऊ भाषण देत मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे. भाजपाने विकास कामे सांगून व थेट मत मागावे. योगी आदित्यनाथ यांच्या, बटेंगे तो कटेंगे, हा नारा आरएसएसला आवडतो. त्याच्याविरोधी नरेंद्र मोदींनी, एक है तो सेफ है चा नारा सुरु केला. मोदी व योगी बसून नेमका कोणता नारा द्यायचे ते ठरवावे. मारनेवाले, बांटनवाले तुम्हीच आणि दुसऱ्यांना बचेंगे तो कटेंगे सांगतात. देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. भाजपाच्या कोणी बलिदान दिले ते सांगा? मोदी हे खोटं बोल पण रेटून बोल या नितीचा अवलंब करतात,” असेही खर्गे म्हणाले.
“महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात भाजपाने त्यांचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते सर्वांना कामाला लागले आहे. पण जनता आता त्यांना साथ देणार नाही. महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी मविआचे सरकार आणा,” असे आवाहनही खर्गे यांनी केले.
हे ही वाचा:
मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी, पंतप्रधान आहे पळणारा चित्ता…
PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य