Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या (BJP) मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाच्या संदीप नाईक (Sandeep Naik) यांच्यावर मात करत विजय मिळवला आहे. यावर त्यांनी पैशाच्या आणि दादागिरीच्या जोरावर मतदान खेचणाऱ्या नेत्यांपेक्षा मी माझ्या कामाच्या जोरावर तीन वेळा निवडून आले असल्याचे वक्तव्य केले आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत आगामी योजनांचा आढावा घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “पैशाच्या आणि दादागिरीच्या जोरावर मतदान खेचणाऱ्या नेत्यांपेक्षा मी माझ्या कामाच्या जोरावर तीन वेळा निवडून आले आहे. नवी मुंबईच्या जनतेने मला पाठिंबा दिला आहे. विरोधकांनी केवळ टीका केली, पण आम्ही विकासकामे केली. आम्हाला घरोघरी भेटून पाठिंबा मागायची वेळ नाही, कारण जनतेला माहित आहे की नवी मुंबईचा खरा विकास कोण करतो.”
आगामी पाच वर्षांत नवी मुंबईत सौरऊर्जेवर आधारित विजनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नागरिकांसाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी १००% प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मंदा म्हात्रे यांनी विरोधकांवर निशाणा साधत सांगितले, “नवी मुंबईच्या जनतेला माहित आहे की, शहराला कोणाच्या हातात सोपवायचे आहे. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनीच आम्हाला सतत निवडून दिले आहे. पैशाच्या आणि दादागिरीच्या जोरावर मतदान केले नाही. 91 हजार लोकांनी मतदान केले एकही पैसा न देता सलग्न तीन वेळा निवडून आले. मंत्रीपेक्षा मी स्वतःला बारी समजते,” असंही मंदा म्हात्रे म्हणाल्या.
हे ही वाचा:
शिंदे गटातील प्रबळ दावेदार Devendra Fadnavis यांच्या भेटीला…
Eknath Shinde यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री ?