राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते Chhagan Bhujbal राज्याच्या मंत्रीमंडळातून डावलल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी त्यांनी अनेक वेळा प्रसारमाध्यमांतुन जाहीर केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर त्यांनी वेळा टीका देखील केली होती. त्यावरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यामुळे पक्षात अनेक अंतर्गत वाद देखील सुरु झाले होते. परंतु, सद्य स्तिथीत, माणिकराव कोकाटे यांना छगन भुजबाळांबद्दल विचारले असता त्यांनी शांततेची भूमिका घेणे पसंद केले. शनिवारी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना, पक्षाकडून मला भुजबळांबद्दल भाष्य करू नये, असा संदेश असल्याने माझ्याकडून भुजबळांचा विषयच संपल्याचे,कोकाटे यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री छगन भुजबळांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण, आरोप प्र्त्यारोप नको. भुजबळांबाबत कोणतेही वक्तव्य करू नये, असा पक्षाकडून मला आदेश आहे. त्यांच्याबाबतीत जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यांचा विषयच संपला आहे, असे बोलून त्यांनी भुजबळांसदर्भात सुरू असलेल्या वादावर पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी शांततेची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर त्यांनी जोरदार हल्लाबोल देखील केला. यावर माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. माणिकराव कोकाटे कृषिमंत्री झाल्यावर नाशिकमध्ये झळकलेल्या बॅनरमध्ये छगन भुजबळ यांचा फोटो गायब झाला होता. तर भुजबळांचे कट्टर विरोधक असणारे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा फोटो बॅनरवर झळकल्याने नवीन वादाची ठिणगी पडली. तर याचे स्पष्टीकरण देताना, जे बॅनर लावले आहेत ते कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे आणि कुणाचे नाही टाकायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मला विचारून बॅनर लावलेले नाही, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी यावेळी दिली होती.
राष्ट्रवादी पक्षाने भुजबळांचे खूप लाड केले आहेत, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात, अशी टीका काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी केली होती. कोकाटेंच्या टीकेला भुजबळांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. माणिकराव कोकाटे हे उपरे आहेत. ५ वर्षापूर्वी ते राष्ट्रवादीत नव्हते. त्यांना पक्षात यायचे होते म्हणून त्यांनी आधी आपली माणसे पक्षात पाठवली. शरद पवारांना मी बोललो होतो ते घ्यायला तयार नव्हते. परंतू, मी आग्रह केला म्हणून त्यांना राष्ट्रवादीत घेतल्याचे प्रत्युत्तर भुजबळांनी दिले होते. तर यावर पक्षाकडून मला भुजबळांबाबत बोलू करू नये, असा आदेश असल्याने माझ्याकडून भुजबळांचा विषय संपला असल्याचे सांगत माणिकराव कोकाटे यांनी शांततेची भूमिका घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा:
MNS बद्दल विचारताच आदित्य ठाकरेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा !, म्हणाले,…