मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभरात आंदोलन झाले. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, आंदोलनाला हिंसक वळण आले. त्यांनतर सर्वपक्षीय मंत्र्यांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात घेतलेल्या निर्णयानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. आपली प्रकृती चांगली आहे, मी ठणठणीत आहे, काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांनी मला बरे केले आहे आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. परंतु, चांगले दिवस येतील आणि आपल्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे म्हणून जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. म्हणूनच, जरांगे-पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा दौरा सुरू करणार आहोत. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा मी जाहीर करेन. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागात आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहोत अशी माहिती म्हणून जरांगे पाटील यांनी दिली.
आपले आंदोलन शांततेचे आणि लोकशाही मार्गाचे आहे. कोणीही आत्महत्या करू नका. वाईट निर्णय घेऊ नका. उद्रेक होईल, असे काही करू नका. २४ डिसेंबर पर्यंत आपल्याला खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवावेच लागेल. आतापर्यंत आपल्यावर खूप अन्याय झालाय, हक्काचे आरक्षण आपल्याला मिळायला हवे. शेती पाहायची आहे, मुलांसाठी काम करायचे आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे म्हणून जरांगे पाटील यांनी जाहीर केले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्यांच्यासाठीच काम करणार आहोत, असेही यावेळी ते म्हणाले.
तुम्हाला वाटत असेल तुम्ही अर्धवट आरक्षण द्याल आणि आम्ही ते मान्य करू, पण तसं नाहीये, अर्धवट आरक्षण आम्हाला मान्य नाही असे म्हणत जरांगे-पाटील यांनी सरकारला सुनावलं होतं. बहुतेक आमदार मुंबईकडे गेले आहेत, राजीनामा देण्याचं कारण कळात नाहीये. सर्व आमदार आणि खासदार मुंबईमध्येच राहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो, काय माहिती. पण सर्वानी मुंबई सोडायची नाही. असे म्हणत राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांना समाज विसरणार नाही, राजीनामा देऊन काय साध्य होणार आहे? असा सवाल मनो जरांगे-पाटील यांनी उपोषणावेळी उपस्थित केला होता.
हे ही वाचा :
अजित पवार गट आणि भाजपचा एकमेकांवर पैसे वाटल्याचा आरोप
NASHIK ELECTIONS: उमेदवार सदस्यांचे पती आणि समर्थकांमध्ये हाणामारी