Thursday, November 30, 2023

Latest Posts

MANOJ JARANGE ON MARATHA RESERVATION: जाणून-बुजून षडयंत्र रचलं जातंय

भुजबळांच्या पाहुण्यांचं हॉटेल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडलं असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही असं काहींनी ठरवलंय, असेही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातल्या पोलिसांवर दवाब आणला जातोय. जाणून-बुजून षडयंत्र रचलं जातंय, दडपण आणलं जातंय का याची चौकशी व्हायला हवी. जात संपवायची वेळ येऊ देऊ नका.. असं जर केलं तर तुम्ही संपलाच समजा. असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना दिला. ओबीसी (OBC) नेत्यांना वठणीवर आणण्याची ताकद मराठा नेत्यांमध्ये आहे. आमच्या लेकराचं आम्ही वाटोळं होऊ देणार नाही असेही जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले.

मराठा समाजाला आवाहन करतो. आपल्या गोरगरीबांचं आता कल्याण होणार आहे. फक्त एक, दोन ओबीसींना ते पाहावत नाही. त्यामुळे मराठ्यांनी शांततेत आपली एकजूट वाढवा. महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे सर्व पक्षांचे नेते आहेत, त्यांना विनंती आहे, जाणूनबुजून षडयंत्र रचलं जात आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या पोरांना केसेसमध्ये अडकवले जात आहे. मराठ्याचा मुलांना तुम्ही मदत केली नाही, तर महाराष्ट्रातील मराठ्यांची पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. निवृत्त न्यायमूर्तींना देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVIS) यांनी पाठवलं की एकनाथ शिंदेंनी मला माहीत नाही. पण पाठवणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी योग्यच केलं. खुर्चीत बसून न्यायदान करणं आणि जनतेत जाऊन न्यायदान करणं चांगलंच आहे. न्यायाधीश जनता दरबार घेऊन शकतात. जनतेत येऊ शकतात. न्याय करणारे जनतेत गेले तर तुम्हाला काय वाईट वाटलं. एवढीपण जळजळ का व्हावी मराठा समाजांबद्दल, असा सवाल मनोज जरांगे यांनी भुजबळ (CHHAGAN BHUJBAL) यांना केला.

हे ही वाचा : 

सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची देखील हवेची गुणवत्ता खालावली; निर्देशांक १६१ पार

आजचे राशिभविष्य,७ नोव्हेंबर २०२३; तुमच्यापैकी काही जण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss