spot_img
Sunday, January 19, 2025

Latest Posts

“२५ जानेवारीनंतर तुमची मस्ती उतरवणार”…, Manoj Jarange यांचा धनंजय मुंडेवर निशाणा

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवमधील आक्रोश मोर्चातून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला, मनोज जरांगे पाटील जाहीर भाषणात म्हणाले, "जर या पुढे मराठयांना त्रास झाला तर सामना मनोज जरांगे यांच्याशी आहे धनंजय मुंडे यांना सांगतो, तुमची टोळी थांबवा, ही धमकी नाही तर सावध करत आहे.

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवमधील आक्रोश मोर्चातून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला, मनोज जरांगे पाटील जाहीर भाषणात म्हणाले, “जर या पुढे मराठयांना त्रास झाला तर सामना मनोज जरांगे यांच्याशी आहे धनंजय मुंडे यांना सांगतो, तुमची टोळी थांबवा, ही धमकी नाही तर सावध करत आहे. यापुढे तुमच्या गुंडांनी कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवा त्याचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. तुमचे पाप झाकण्यासाठी पांघरून घेऊ नका, २५ जानेवारीनंतर तुमची मस्ती उतरवणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. मी २५ तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही. त्यावेळी उपोषण केल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्याशिवाय मग धनंजय मुंडे यांना पाहतो. धनंजय मुंडे यांचे पाप लपवण्यासाठी ओबीसींचे पांघरून घेत आहे, संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागला नाही तर आम्हाला हा मोक्का मान्य नाही. खंडणीतील आरोपींवर मोक्का लागला पाहिजे. खंडणीमुळेच हा गुन्हा घडला आहे. त्यामुळे खंडणीतील आरोपी खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुटुंबाला शब्द दिला तो पाळा, असे मनोज जरांगे पाटील म्हणले.

मनोज जरांगे पाटील मराठा समाजास संबोधित करताना म्हणाले की, शांत राहा. पण तुमच्या कुटुंबाचे, गल्लीचे गावाचे सरंक्षण करावे तुम्हाला करावे लागणार आहे. तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावा लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकांना मदत करा नाहीतर मुडदे पडतील, आपल्या लेकी बाळे संपतील. किती दिवस आपण मुक्याप्रमाणे बसणार आहेत. हे मूठभर आहेत, त्यांचा माज उतरवण्यास वेळ लागणार नाही. संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तर यापुढे सावध राहा. मी त्यांना मोजत नाही. कधी मोजणार नाही. मी मृत्यूस घाबरत नाही. तुम्हाला मरा म्हणून सांगणार नाही. परंतु तुम्ही बेफिकीर राहू नका. या लोकांना नीट करण्याचा सर्व गोष्टी मराठ्यांचा हातात आहे. ही लोकं धनंजय देशमुख यांना धमकी देत आहोत आणि आम्ही गुंडाना बोलायचे नाही का ? आता जसेच्या जसे उत्तर द्यावे लागणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Latest Posts

Don't Miss