spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वत्र निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. यातच मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाचा निर्णय झालेला आहे. मराठा समाजाला मी लोकसभेला सांगितले होते, ज्याला पडायचे आहे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मराठा समाज हा बुद्धिजीवी आहे. त्यांना ताबडतोब ते लक्षात आले. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी मध्ये महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. मात्र या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मराठा समाजाचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवण्याच्या तयारीत होते. मात्र यानंतर त्यांनी माघार घेतली होती. आता ते कोणाला पाठिंबा देतात? या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी मराठ्यांना हेच सांगितले आहे की, ज्यांना पडायचे आहे त्याला पाडा आणि ज्यांना निवडून आणायचे आहे त्याला निवडनू आणा. मी माझ्या शब्दावर पहिल्यापासून ठाम आहे, आणि आजही कायम राहणार आहे, आणि उद्याही ठाम राहणार आहे. राज्यातील मराठा समाज माझ्या ऐकण्यात आहे. मी जर म्हणालो याला मतदान करा, तर याचा अर्थ मी जात विकली असा होतो किंवा ताब्यात ठेवला असा होतो. पण मी माझ्या मराठा समाजाला कुणाच्याही ताब्यात कसा बांधेल?

कुणालाच पाठिंबा नाही

मनोज जरांगे यांनी असे स्पष्ट केले आहे की, गावामधील महायुती आणि महविकास आघाडीचे दोन-चार जण खोटे बोलतात की, जरंगे पाटीलांचा अजूनही आदेश आला नाही. ती लोक संभ्रम पसरवतात. मात्र समाजामध्ये कुठलाही संभ्रम नाही. समाज हा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. या कडीपासून त्या कडीपर्यंत पडणार आहे. मी राज्यामध्ये कोणालाही पाठिंबा दिला नाही, मी कोणत्याही पक्षाला आणि अपक्षालाही पाठिंबा दिलेला नाही. निवडणुकीमध्ये उभे असलेल्या कोणत्याही उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला नाही.

लोकसभेत सांगितले…

मराठा समाजाचा निवडणुकीत काय निर्णय असणार यावर मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाचा निर्णय झालेला आहे. लोकसभेला मी मराठा समाजाला सांगिलते होते, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. लोक आम्हाला वेड्यात काढतात. मराठा समाज एकमेकांना ऐकत नाही, एकत्र येत नाही. मराठ्यांना गॉड बोल की, मराठा फसतात. मात्र मराठ्यांनी दाखवून दिले की, आता कोणाचेही नाव न घेता मराठा समाज त्यांना धुळीस मिळूवु शकतो. मनोज जरांगे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल बोलताना म्हणाले की, राजांच्या राजगादीचा मी पहिल्यापासून सन्मान करतो आणि त्या सर्वाना माहित आहे. मी आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या राजगाद्यांचा सन्मान करतो. या राज्याला मुलगा म्हणून खरं बोलणे अपेक्षित असते आणि मी ते बोलतो. मला मराठा समाजाची आरक्षणाची लढाई लढायची आहे आणि ती लढाई माझ्यासाठी महत्त्वाची आहे.

नवीन सरकार येताच उपोषण

राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. त्यावेळी कोणाचेही सरकार आलें तरी, आम्ही आंदोलन करणार आहोत. मात्र आता सरकार कोणाचेही येऊ द्या, मराठा समाजापुढे ते चिल्लर आहे. मनोज जरांगे यांनी सांगितले की गरिबांची मागणी आरक्षण आहे, राजकारण नाही. मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांन वरती निशाणा साधत म्हणाले की, दहा टक्के आरक्षण आम्ही तुमच्याकडे मागितले नव्हते. हे दहा टक्के आरक्षण टिकणारही नाही. जेव्हा १३% आरक्षण रद्द झाले होते त्यावेळी मराठ्यांच्या मुलांचे नुकसान झाले होते, आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणारच आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचे सरकार शेतकरीविरोधी, भाजपला पराभूत करून राज्यात बळीराजाचे राज्य आणा : नाना पटोले

दोन्ही Thackeray भाऊ गोंधळलेत, Shinde गडबडलेत Uddhav-Raj Shivsena- CM- Jogeshwari

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss