महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काल २३ नोव्हेंबरला लागला असून जनतेने महायुतीला कौल दिला. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीचा २३६ जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला ४९ जागांवर यश मिळाले. महायुतीत भाजपने १३२ जागा जिंकल्या. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत सरावात जास्त जागा लढवणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. महायुतीच्या विजयानंतर सरावानं उत्सुकता लागली आहे ती राज्याचा मुख्यमंत्री अखेर कोण होणार? तर भाजप सर्वाधिक जागा घेऊन विजयी झाल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा रंगल्या आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर देखील मनोज जरांगे यांनी नाव न घेता टीका केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही मैदानात नव्हतो, तुला जरांगे आणि मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल. आयुष्य गेलं तरी हे जरांगे काय रसायन आहे हे कळणार नाही. मर्दासारखं बोलायचं, आपण ज्याच्या सभा घेतल्या तो निवडून आला पाहिजे. मराठ्यांचे दीडशे होते, आता २०४ झालेत. मराठ्यांशिवाय पण हलू शकतनाही. काहींना कुत्र्याचं कातडं पांघरून वाघ झाल्यासारखं वाटतं. मी मराठा बंधनमुक्त केला होता. राजकारणाच्या दहशतीपासून मी मराठा समाजमुक्त केला, अशी टीका त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली आहे.
मनोज जरांगे हे राजेश टोपे यांच्या पराभवाबाबत म्हणाले की, जर जीत होत असते, सगळ्या दुनियेत होत असते, सगळ्याच राज्यात असे झाले आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच राज्यात मराठ्यांचा नाद करू नये, मराठ्यांनी शेवटी २०४ आणले. सरकार स्थापन झाले की, आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही. तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
शरद पवारांचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने मारली बाजी तब्बल इतक्या जागांवर मिळवला विजय…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.