मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन उपोषण केले. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे मराठा समाजाने ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले त्या आंदोलनाला हिंसक वळण आल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला. त्यात आता सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर (SAHYADRI GUEST HOUSE) आज सकाळी साडेदहा वाजता सर्व पक्षांची बैठक पार पडणार आहे. शरद पवार (SHARAD PAWAR), अशोक चव्हाण (ASHOK CHAVAN), अंबादास दानवे (AMBADAS DANAVE), उदयनराजे भोसले (UDYANRAJE BHOSALE), संभाजी राजे छत्रपती (SAMBHAJIRAJE CHATTRAPATI) तसेच पक्षातील इतर नेते या बैठकीत हजर राहणार आहेत. मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था बिघडत चालली आहे त्यामुळेच ही शांतता टिकवण्यासाठी सर्वपक्षीयांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनामुळे हानी होऊ नये याकरता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आवाहन करणे गरजेचे आहे असे मत सरकारने मांडले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी मराठा आरक्षणाबाबत (MARATHA RESERVATION) आयोजित केलेल्या सर्व पक्षांच्या बैठकीत आरक्षणाबाबत विविध पक्षांची आरक्षणासंदर्भात असलेली भूमिका आणि त्यांची मत विचारात घेतली जाणार आहेत. याशिवाय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने सादर केलेला अहवाल सर्वपक्षीय बैठकीत मांडून त्यावर सर्व पक्षांच्या नेत्यांशी बैठकीत चर्चा होणार आहे. सर्व पक्षांकडून राज्यात उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आणली जावी याकरिता राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन या बैठकीत केले जाणार आहे त्यासोबतच मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अन्य काही कायदेशीर उपाययोजना होऊ शकतात का, याबाबत निमंत्रित सर्व पक्षांच्या नेत्यांकडून माहिती घेण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा