शिंदे कमिटीमध्ये १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात कुणबी जुन्या नोंदी आढळून आल्या. जुन्या रेकॉर्डमधील काही रेकॉर्ड्स उर्दू आणि मोडी लिपीतले आहेत. ११,५३० कुणबी जुन्या कागपत्रांच्या नोंदी सापडल्या आहेत. मूळ मराठा आरक्षण जे सुप्रीम कोर्टात रद्द करण्यात आले होते, त्यावर सरकारचे काम सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठा समाजाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. मुंबई आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवर भाष्य केले. तसेच पत्रकार आणि मराठा समाज बांधवांना आवाहन केले.
टोकाचे पाऊल उचलू नका
मराठा समाजाने आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलणे चुकीचे ठरेल. कोणीही आत्महत्या करू नका. आपल्या परिवाराचा विचार करा. आम्ही प्रयत्न करत आहोत. असे भावनिक आवाहन पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले.
तुम्ही समाजाचा भाग आहात
पत्रकारांनो, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. तुम्ही समाजाचा भाग आहात. आम्ही जे निर्णय घेतले आहेत किंवा घेणार आहोत, त्याबद्दल मी सांगतोय. मी देण्याची प्रामाणिक भूमिका आम्ही घेतली. समाजात घडणाऱ्या गोष्टींना कितीवेळा प्रसिद्धी द्यावी, हे ठरवणे गरजेचे आहे. मी जे सांगतोय त्याचा वेगळा अर्थ न घेता, समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी, यासाठी योग्य गोष्टींची प्रसिद्धी करावी, असे आवाहन सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना केले.
सरकारला थोडा वेळ द्यावा
मी मनोज जरांगे-पाटील यांच्याशी संवाद साधणार आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, स्वतःची काळजी घ्यावी. त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. शेवटी सरकारला सुद्धा त्यांच्या तब्येतीची चिंता आहे. सरकारने त्यांचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. म्हणूनच, आज सर्वांची बैठक घेण्यात आली. त्यात सुदैवाने २ मार्गांनी जुन्या कुणबी नोंदींच्या माध्यमातून रद्द झालेले आरक्षण देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे.
हे ही वाचा :
कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा