मनोज जरांगे- पाटील (MANOJ JARANGE-PATIL) यांचे मराठा आरक्षणासाठी (MARATHA RESERVATION) उपोषण सुरु आहे. या उपोषणात आता त्यांनी आजपासून पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा विषय हिंसक वळण घेत आहे. मराठा समाजाने केलेल्या आंदोलनात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. अशातच, मनोज जरांगे- पाटील (MANOJ JARANGE) यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वचजण मनोज जरांगे- पाटील यांना पाणी पिण्याची विनंती करत होते. त्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी पाण्याचे ४-५ घोट घेतले होते. तब्येत साथ देत नसल्याने त्यांना पाणी गिळायला सुद्धा त्रास झाला होता. पाणी पिण्याचा निर्णय न घेतल्याने आंदोलनाला हिंसक वळण येत असल्याचे पाहायला मिळत होते म्हणूनच, मनोज जरांगे- पाटील यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनतर मनोज जरांगे-पाटील माध्यमांशी बोलणार आहेत. जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत काय तपशील देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. अनेक राजकीय नेत्यांची कार्यालयं आणि घरं पेटवून देण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्या अनुषंगाने राजकीय नेत्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आंदोलन आणखी चिघळू नये, म्हणून मनोज जरांगे-पाटील यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :
राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा