गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (MARATHA RESERVATION) मुद्यावरून राज्यभरात चर्चा आणि आंदोलन केले जात आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा अट्टहास करून लढा देणारे मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील (MANOJ JARANGE-PATIL) हे येत्या सोमवारी अर्थात २० नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील (THANE DISTRICT) कल्याण (KALYAN) येथे दाखल होणार आहेत. मराठा समाजाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे-पाटील कल्याण तालुक्यातील कोळसेवाडी (KOLASEVADI) या भागात येणार आहेत. कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर पोटे मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या (MARATHA KRANTI MORCHA) कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांना कल्याण या ठिकाणी घेऊन येण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरु होते. मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याने ते शक्य होऊ शकले नाही. परंतु, आता मनोज जरांगे-पाटील (MANOJ JARANGE-PATIL) यांनी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर राज्यभर दौरा करण्याचे जाहीर केले. या दौऱ्याचा भाग म्हणून मनोज जरांगे कल्याणमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
कल्याण तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या कोळसेवाडी (KOLASEVADI) या भागातील पोटे मैदानावर सायंकाळी ६ वाजता मनोज जरांगे-पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या (THANE DISTRICT) विविध भागातील मराठा समाजाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थिती दर्शवणार आहेत. या जाहीर सभेच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सभा यशस्वीपणे पार पडावी, यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.१ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा दौरा सुरू करणार आहोत. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा मी जाहीर करेन. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागात आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहोत अशी माहिती काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील यांनी दिली होती.
हे ही वाचा :
पॅन कार्ड होणार बंद।If PAN card is not linked with Aadhaar, PAN card will be closed.
अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊत