अंतरवली सराटीतून मनोज जरांगे-पाटील यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्या, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाल्यांनतर मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही ऐकणार नाही
कितीही कारणे सांगितली तरीही आम्ही ऐकणार नाही, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. ६० ते ६५ टक्के आधीच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण होते. अशी माहिती देत मराठे आणि कुणबी एकच असल्याचा २००४ चा जीआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
अर्धवट आरक्षण आम्हाला मान्य नाही
तुम्हाला वाटत असेल तुम्ही अर्धवट आरक्षण द्याल आणि आम्ही ते मान्य करू, पण तसं नाहीये, अर्धवट आरक्षण आम्हाला मान्य नाही असे म्हणत जरांगे-पाटील यांनी सरकारला सुनावलं आहे. मुंबईत जाऊन सर्वांनी आवाज उठवा, असे सांगण्यात आले होते. बहुतेक आमदार मुंबईकडे गेले आहेत, राजीनामा देण्याचं कारण काळात नाहीये. सर्व आमदार आणि खासदार मुंबईमध्येच राहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो, काय माहिती. पण सर्वानी मुंबई सोडायची नाही. असे म्हणत राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांना समाज विसरणार नाही, राजीनामा देऊन काय साध्य होणार आहे? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
मराठे खालच्या पातळीचे नाहीत
शेतीची लाज वाटण्याइतके मराठे खालच्या पातळीचे नाहीत, शेतकरी नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाहीत. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही. असे मुख्यमंत्री शिंदे यांना कॉलवर सांगितल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.
म्हणून पाणी पिण्याचा निर्णय घेतला
मला बोलतांना धाप लागतेय. पाणी गिळायला त्रास होतोय. पण पाणी पिल्यामुळे मला बरं वाटतंय. पाणी पिण्याचा निर्णय न घेतल्याने आंदोलनाला हिंसक वळण येत असल्याचे पाहायला मिळत होते म्हणूनच, मी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. असे मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा :
राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा