कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली. आता पुन्हा एकदा कल्याणमध्येच परप्रांतीयांकडून दादागिरी पाहायला मिळाली आहे. चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तम पांडे याची पत्नी ने देखील मारहाण केली आहे. या घटनेनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जसच चिमुकलीच्या कुटुंबियांना समजलं तसच त्यांनी जाब विचारण्यास सुरवात केली. जाब विचारण्यात गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत मराठी कुटुंबातला तरुण जखमी झाला आहे त्याच्या पत्नीला आणि आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. या शिवाय यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत. पोलिसांनी उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि पुशिलं प्रकरणाचा तपस सुरु करण्यात आलाय.
काही दिवसांपूर्वी देखील मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. तुम्ही मराठी माणसं घाण आहात, मटण मच्छी खाता असं म्हणत एमटीडीसी अधिकारी अखिलेश शुक्ला याने गुंडांना बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. अखिलेश शुक्ल आणि वर्ष कालविकट्टे हे एकमेकांच्या शेजारी राहतात. नेमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करत असाताना धूप लावत असतात. या धुपाचा धूर कळवीकट्टे यांच्या घरात जात असल्याने गीता यांच्या घरातील तीन वर्षाच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम लागतो. या धुराचा त्रास होतो असं सांगितलं. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. विरोधी पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबन करण्यात आल्याची घोषणा विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule