बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर राज्यात चॅनलचा वातावरण तापलं आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र त्यानंतर सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. या भेटीवरून मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यानंतर आता सुरेश धस यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची तसेच तेथील ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर मनोज जर्नेग पाटील आणि प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
त्या विषयात मला काही बोलायचं नाही, तो विषय माझ्यासाठी संपला आहे. मी एवढा जीव लावला होता, समाजाने देखील तळ हातावर घेतलं होतं, एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची काहीच गरज नव्हती. तुमच्यावर पक्षाचा दबाव होता ना, तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होतं, मी समाजाची गद्दारी करू शकत नाही. माझ्यावर पक्षाचा दबाव आहे असं आमदार धस यांनी म्हणायला पाहिजे होतं. मी माझ्या समाजासाठी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देतो, मात्र मी धनंजय मुंडे यांना भेटू शकत नाही, असं धस यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Narendra Modi : RSS मुळे माझा मराठीशी संबंध म्हणत, नरेंद्र मोदींनी केला मराठी भाषेचं कौतुक
Follow Us