Wednesday, June 7, 2023

Latest Posts

माविआचा १६-१६ जागांचा पॅटर्न अजून ठरलेला नाही, संजय राऊत

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये १६-१६ जागांचा फॉर्मुला ठरला आहे अशी माहिती चुकीची आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये १६-१६ जागांचा फॉर्मुला ठरला आहे अशी माहिती चुकीची आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये १६-१६ जागांचा असा कोणताही फॉर्मुला अजूनपर्यंत ठरलेला नाही असे संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात प्राथमिक चर्चा आता सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणी, कुठे बैठक घ्यायची याबाबत चर्चा झाली आहे. परंतु जागावाटपाची अजून कोणतीही चर्चा झाली नाही आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि कायम राहील. लोकसभा विधानसभेच्या निवडणूक या माविआच्या वज्रमुठीने लढवणार आहेत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले की, कोणी काहीही म्हणो पण आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही आणि होणारही नाही असा विश्वास त्यांनी वाक्य केला आहे. सध्या सत्तेमध्ये शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचे म्हणत सत्तेतून घालवू असा इशारा संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. त्याचबरोबर २०१९ मध्ये महाराष्ट्रामध्ये जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल आणि पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे महाराष्ट्रामधील १८ जागा आणि दादर नगर हवेलीमधील एक असे सर्व मिळून १९ जण निवडणूक येतील असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विधान केले होते की, कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. या विधानाचा समाचार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्या, ते असं बोलले की, आमच्या जागा वाढतात. कर्नाटकमध्ये गुजरात पॅटर्न राबवला पण कर्नाटकच्या जनतेने तो पॅटर्न उधळून लावला. महाराष्ट्रामध्ये लवकरच सत्ता परिवर्तन होणार असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाने सर्वाच्च न्यायालयामध्ये आठ मागण्या केल्या आहेत परंतु एकही मान्य केली असं फडणवीस यांनी बोलणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्यासारखं आहे असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss