विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचे नेते नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन दोन मर्सडिज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप दिल्ली येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे केला. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निलम गोऱ्हे ही निर्लज्ज, नमकहराम बाई आहे, अश्या शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. तर, नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा गौप्यस्फोट देखील केला. यावर ठकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंनी नीलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केला आहे.
काय म्हणाले विनायक पांडे
2014 ची विधानसभा निवडणूक लागली मी आणि अजय बोरस्ते दोघे ही इच्छुक होतो. नीलम गोऱ्हे यांचा भैय्या बहाते कार्यकर्ते होता. त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याशी बोलायचे का असे सांगितले. तेव्हा मी हो सांगितले. नीलम ताईंना काही रक्कम दिली त्यांनतर अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आले. मी त्यांना सांगितले मला पैसे द्या अन्यथा पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यांनी मला बोलवून पैसे दिले. मात्र, त्यात काही पैसे कमी दिले आहेत, असा दावा त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही माझ्याकडून पदासाठी पैसे मागितले नाही. पण नीलम ताईंनी माझ्याकडून पैसे घेतले. आता राज्यभरातून असे अनेक कार्यकर्ते पुढे येतील. मराठी साहित्य संमेलन होते तिथे त्यांनी अशी भूमिका मांडायला नको होती. आता राज्यातील अनेक नेते पुढे येतील. पैसा दिल्याशिवाय ही बाई कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नव्हती. मला 43 वर्ष झाली, मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी कायम खुले होते. या बाईने जिथे जिथे संपर्क नेते होते, तिथे असेच केले आहे. तिकीटासाठी माझ्याकडे पैसे मागितले, स्पर्धा होती म्हणून पैसे मागितले. पण, तिकीट अजय बोरस्ते यांना दिले. मी उपमहापौर, महापौर झालो. पण कधीच पैसे दिले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही वाचा:
Uddhav Thackeray : असले गयेगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही – उद्धव ठाकरेंचं उत्तर
MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश