Friday, December 1, 2023

Latest Posts

“शरद पवारांच्या दाखल्यावर ‘मराठा’ म्हणून उल्लेख – जयंत पाटलांनी सुनावलं

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा तापला आहे. अशातच शरद पवार ‘ओबीसी’ असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव यांनी केला आहे.

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा तापला आहे. अशातच शरद पवार ‘ओबीसी’ असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव यांनी केला आहे. नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं आहे. त्यात शरद पवार हे ‘ओबीसी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया देत नामदेव जाधवांना सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “हे अत्यंत चुकीचं प्रमाणपत्र आहे. नामदेव जाधव प्रसिद्धीसाठी शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवत आहेत. तसेच, पवारांना बदनाम करण्याचा उद्योग करत आहेत. मूळ मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न दिसतोय. शरद पवारांच्या शाळेतील दाखल्यावर ‘मराठा’ म्हणून उल्लेख आहे.”

“दाखला इंग्रजीत असू शकतो का?”
याप्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केलं आहे. “हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. शरद पवार दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजीमधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. पवार दहावीला होते तेव्हा त्यांचा दाखला इंग्रजीत असू शकतो का? आजकाल खोटी प्रमाणपत्रे बाजारामध्ये सर्रास मिळतात”, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं आहे. त्यात शरद पवार हे ‘ओबीसी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया देत नामदेव जाधवांना सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं आहे. त्यात शरद पवार हे ‘ओबीसी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया देत नामदेव जाधवांना सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

हे ही वाचा : 

प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते  ‘हीच माझी दिवाळी’

MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss