कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्ताऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात त्यांना शिक्षा थोटवली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता शिक्षेला आवाहन देण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी आज सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. ते आज आपली अपील सत्र न्यायालयात दाखल करणार आहे. दुपारी तीननंतर यावर सुनावणी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत.
काय म्हणाले माणिकराव कोकाटेंचे वकील?
माणिकराव कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे म्हणाले की, 20 तारखेला कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत जे जजमेंट दिले आहे त्याबाबत आपण आज अपील करत आहे. ऑनलाईन सबमिशन दाखल केले जाणार आहे. त्यानुसार सुनावणी निश्चित होईल. न्यायालयाने जे जजमेंट दिले आहे त्यावर आपण अपील करतोय. तांत्रिक मुद्दे आत्ता सांगू शकत नाही. आज लवकर सर्क्युलेशन झालं तर सुनावणी आजच होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रकरण काय ?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
ही वाचा:
Uddhav Thackeray : असले गयेगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही – उद्धव ठाकरेंचं उत्तर
MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश