spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

मंत्री नितेश राणेंचा नवा धोरण; आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट

नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे मंत्री नितेश राणे यांनी एक निर्धार केला आहे. आता मतं दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. फक्त हिंदू समाजातील खाटिकांना मल्हार सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस खरेदी करू नका, असे आवाहन देखील केले आहे. त्यांनी याबाबत ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली आहे. आता या आवाहनामुळे नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री नितेश राणेंची पोस्ट काय?

त्यांनी म्हटलंय की, आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस… आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम https://malharcertification.com या निमित्ताने सुरू झालेलं आहे.

सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये

मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व 100 टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असं आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हे निश्चित, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांच्या केलेल्या आवाहनानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss