spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

मीरा भाईंदरच्या नगरसेवकांनी ठोकला ठाकरे गटाला राम राम; राजन साळवींचा आज शिंदे गटात प्रवेश

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ठाकरे गटाला धक्केवर धक्के बसत आहे. आता मीरा भाईंदर शहरातून मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे तीन माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो आणि माजी नगरसेवक जार्जी गोविंद यांनी उद्धव ठाकरेंना राम राम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश महत्वही मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे मीरा भाईंदरमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषची भावना निर्माण झाली आहे.

राजन साळवी यांचा ठाकरे गटाला राम राम
ठाकरे गटाचे राजन साळवी हे देखील आज ठाण्यात शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. लांजा, राजापूर,साखरपा या भागातील त्यांचे हजारो कार्यकर्ते बुधवारी रात्री मुंबईच्या दिशेने रावण झाले होते. आज हे सर्व कार्यकर्ते राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी हजार राहणार आहेत. मोठे शक्तिप्रदर्शन देखील केले जाणार आहे. राजन साळवी याना शिवसेनेत योग्य ते सन्मान मिळेल अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले राजन साळवी ?
राजन साळवी यांच्या आज होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी किरण सामंत आणि राजन साळवी यांची बैठक पार पडली. रात्री तब्बल दोन तास बैठक सुरु होती. यानंतर राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्या सोबत मी जाऊ शकलो नाही.. परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो. एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेतला. आजच्या या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री उदय सामंत,आ. किरण सामंत आम्ही एकत्र बसलो आमच्या मतदारसंघातील जिल्हा संदर्भातील ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या बाबत चर्चा झाल्या त्या ठिकाणी सर्व चर्चा सकारात्मक झाल्या आहेत.

सामंत बंधू आणि मी सुद्धा समाधानी आहोत. आम्हा सर्वांना एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात देऊन. संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल. एकत्र काम करून अभिवचन दिलेला आहे.उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होईल याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Rajan Salvi Resigned: ठाकरेंच्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये असणाऱ्या राजन साळवींचा राजीनामा: उद्धव ठाकरेंना रामराम

Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss