विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कठोर पाऊल उचलले आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातील निर्णय 31 डिसेंबर पर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले होते. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कंबर कसली असून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधिमंडळ नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. या वेळापत्रकासाठी अध्यक्षांना जास्त वेळ काम करावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाचे आमदार विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (AMBADAS DANAVE) यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानभवनात भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी संदर्भात ही भेट महत्त्वाचे असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऑर्डर कॉपी आली नाही असं माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे (UDHHAV THACKAREY) यांनी पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष यांना कोर्टाची प्रत आम्ही देणार आहोत असे सांगितले होते. त्यानंतर आता अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे आमदार विधान भवन येथे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटणार आहे.
काहीच दिवसात दिवाळीची सुरुवात होणार आहे अशात दिवाळीच्या सुट्टीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ओव्हरटाईम करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष ॲक्शन मोडवर दिसत आहेत. हिवाळी अधिवेशन तोंडावर आले असून नागपूर हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरू असताना अपात्रता सुनावणी घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय 31 जानेवारीपर्यंत द्यावा, असेही सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना नवे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नव्या वेळापत्रकानुसारही सुनावणी पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत कोणत्याही परिस्थितीत ही सुनावणी 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश दिले आहेत.
हे ही वाचा :
आजचे राशिभविष्य, १ नोव्हेंबर, २०२३, महत्वाचे पाऊल उचलू शकता