विधानसभा निवडणुकीनंतर आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशन हे सुरु झाले होते. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेलआहे. तसेच राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet) दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. तसेच राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरु आहे. अश्यातच राज्यात नाव नवीन घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ४१ आमदार निवडून आले. तेच शरद पवार यांच्या पक्षाला फक्त १० जागांवर समाधान मानाव लागलं. महायुतीमध्ये असलेले अजित पवार आता सत्तेमध्ये आहेत. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला शरद पवार यांच्या पक्षाच्या तुलनेत घवघवीत यश मिळाल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी येऊ लागले आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवशी दिल्लीत सहकुटुंब त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आणि शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांच्या सध्या भेटीगाठी मोठ्या प्रमाणत वाढू लागल्या आहेत. अश्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये अजित पवार यांची भेट घेतली. रोहित पाटील तासगाव-कवठेमहाकाळमधून विधानसभेची निवडणूक जिंकून पहिल्यांदाच आमदार बनले आहेत.
रोहित पाटील यांच्यानंतर सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. सलील देशमुख अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत काटोलमध्ये सलील देशमुख यांचा पराभव झाला. अनिल देशमुख हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांचा मुलगा सलील देशमुखने अजित पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार अशी चर्चा आहे, त्यावर सलील देशमुख म्हणाले की, ‘मला तसं काही वाटत नाही.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule