Friday, December 1, 2023

Latest Posts

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली, राज ठाकरे यांच्या विदर्भात सभा

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली, राज ठाकरे यांच्या विदर्भात सभा

२०२४ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात घवघवीत यश मिळण्याचा दावा आता मनेसकडून करण्यात येत आहे. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भात सभा घेणार असल्याचंही म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे लोकसभा निवडणुका कशा लढणार याचा प्लॅन मनसे नेते राजू उंबरकर यांनी सांगितला आहे. तसंच या निवडणुकीत जिंकण्याचा विश्वासही राजू उंबरकर यांनी व्यक्त केला आहे.

विदर्भात लोकसभेचा ४ जागा लढवणार

विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढणार आहे, असं म्हणत राजू उंबरकर यांनी निवडणुकीवर भाष्य केलं आहे. तसंच या चार जागा मनसे नक्की जिंकेल, असंही उंबरकर म्हणाले आहेत.चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघ, वाशिम लोकसभा मतदारसंघ, अमरावती आणि बुलढाणा मतदारसंघात मनसे आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहेत. काँग्रेसकडे असलेल्या चंद्रपूर – वणी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी मनसेनं कंबर कसली आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातंही महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देऊन निवडणूक लढवणार आहे. अमरावती आणि बुलढाणा मतदारसंघातही निवडणूक लढण्याची मनसेने तयारी केली आहे.

राज ठाकरे यांची विदर्भात सभा होणार

राज ठाकरे यांच्या सभा नेहमीच गाजतात. निवडणुकांच्या काळात तर राज ठाकरे आपल्या भाषणाने विरोधकांवर निशाणा साधतात.ज्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणतात.त्यांचे भाषण अतिशय आक्रमक असतं ज्यामुळे निवडणुकीदरम्यान सर्वत्र राज ठाकरे यांच्या भाषणाचीच चर्चा रंगते. राज ठाकरे यांच्या सभांमुळे मनसेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास राजू उंबरकर यांनी यादरम्यान व्यक्त केला आहे. विदर्भात ज्या मतदारसंघात मनसे आपले उमेदवार रिंगणात उतरवतील त्या ठिकाणी राज ठाकरे दौरा करणार आहेत.

हे ही वाचा : 

जबलपूरजवळ सैन्य दलाच्या गाडीला अपघात

Chhagan Bhujbal यांचा गंभीर आरोप, ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss