Saturday, June 3, 2023

Latest Posts

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज तीन दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे १९ ते २१ मे च्या दरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज तीन दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे १९ ते २१ मे च्या दरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. लवकरच महापालिकेच्या निवडणूका होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे संघटनात्मक आढावा घेणार आहेत. याआधी राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम २०१२ ते २०१७ सत्ता मिळाली होती. २००९ मध्ये महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ३ आमदार निवडून आले होते. म्हणूनच राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे असा अंदाज वर्तवला जात आहे.

राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. आज संध्याकाळी राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. या दौऱ्याच्या दरम्यान राज ठाकरे शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. बऱ्याच महिन्यांनंतर राज ठाकरे नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे एकदा मनसेने नाशिकवर वर्चस्व गाजवायचे ठरवले आहे असे काही बैठकांवरून दिसून आले आहे. मनसेच्या नेत्यांमध्ये जोश भरण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर असणार आहेत.

नाशिकमध्ये उद्या आज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रिकामी झालेल्या पदावर नवीन शहराध्यक्ष राज ठाकरे नेमणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई, नाशिक, पुणे या महत्वाच्या महापालिकेच्या निवडणूका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज संध्याकाळी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान ते शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शहर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या सर्व बैठका शासकीय विश्रामगृहामध्ये होणार आहेत आहेत.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss