Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काल म्हणजे (३० जानेवारी २०२५) रोजी वरळी येथे राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्याच्या निमित्ताने भाषणात मोठं विधान केलं आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का पचवावा लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सभेत बोलताना माजी आमदार राजू पाटील यांचं उदाहरण देत असताना यांच्या उमेदवारी शहराची संख्या १४०० असून त्यांना एकही मत मिळालं नाही. पण खरी वस्तुस्थिती वेगळीच आहे, असे राज ठाकरे म्हणाले. याआधी २००९ मध्ये म्हणजे पक्षाच्या पहिल्या विधान सभेला एकाचवेळी १३ आमदार निवडून आले होते तर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे प्रत्येकी एक आमदार निवडून आले, मात्र यंदाच्या निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही. याच नवलचं मानावं लागेल.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) हा पक्ष मागे पडला आहे, हे राज ठाकरे यांना मान्य नाहीय. “लोकांनी आपले मतदान केले , पण ते मतदान आपल्यापर्यंत आलचं नाही” असं राज ठाकरे म्हणाले. अप्रत्यक्षपणे ते अन्य पक्षांप्रमाणे पराभवासाठी ईव्हीएम ला जबाबदार धरत आहेत. EVM मध्ये काहीतरी गडबड आहे, असं सुचवत मनसेच्या पराभवामागे काहीतरी गडबड असल्याचं वक्तव्य ठाकरेंनी केलं.
Raju Patil यांच्या गावाबद्दल राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी भाषणात बोलताना माजी आमदार राजू पाटील यांच्या मतदार संघात एकूण १४०० मतदार संख्या असून तीन मतदार केंद्रातून त्यांना ६८३ मते मिळाली. त्यांच्या शहराची मतदान यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांच्या गावच उदहारण दिलं होतं. ‘राज ठाकरे यांना चुकीची माहिती कोणी दिली?’ असा सवाल गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Raj Thakeray त्या व्यक्तीबद्दल काय म्हणाले?
माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी संबंधित होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसले की त्यांना हे पटलेले नाही. त्यांनी फार छान वाक्य माझ्यासमोर म्हटले, ते मला म्हणाले की, “इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा…” कोणीतरी जिंकले असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसले उदाहरण आहे, असे यावेळी राज ठाकरेंनी सांगितले. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही, असा आरोपच यावेळी राज ठाकरेंकडून करण्यात आलेला आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले पण केलेले मतदान कुठेतरी गायब झाले, अशाप्रकारे निवडणूक लढवायची असेल तर निवडणूक न लढवलेल्या बऱ्या.
हे ही वाचा :
Sara Ali Khan च्या ‘त्या’ वक्तव्यावर वीर पहारियाची प्रतिक्रिया