Thane: ठाणे महापालिका कार्यालयात मनसे आक्रमक झाली आहे. सर्व सरकारी कार्यालयात मराठीचा वापर झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासनाला आदेश दिलेत. परंतु दुसरीकडे मराठी भाषेतून एमएचे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. ठाणे पालिकेने काढलेल्या या परिपत्रकावर मनसे आक्रमक झाली आहे. मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना महापालिकेने अशाप्रकारे परिपत्रक काढून मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
याबाबत ठाणे मनसेकडून महापालिकेत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी भेट घेतली. आज मराठी भाषा दिन आहे आणि आजच्या दिवशी ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एक जीआर (GR) काढलाय. त्यात मराठीतून ज्यांनी एमए केलेलं आहे. त्यांना वेतनवाढ मिळणार नाही असा हा जीआर आहे. आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. असं अविनाश जाधव यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, पण मराठीतून शिक्षण घेतले म्हणून वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे असं शिक्षण कोण घेईल? ज्याची पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमए (MA) कसा होईल. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली असून संध्याकाळपर्यंत यावर निर्णय घेऊन जीआर रद्द करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेने आज मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम घेणं गरजेचं होतं. हे लाखो करोडो रुपये खर्च करुन इतर कार्यक्रम घेतात, याचा त्याचा सत्कार करतात. मात्र, या महापालिकेत सर्वात जास्त कर्मचारी मराठी असतांना कुठलाही कार्यक्रम पालिकेने घेतला नाही. याबाबत देखील आम्ही जाब विचारला आहे. आज संध्याकाळ पर्यंत या जीआर च्या बाबतीत निर्णय होईल. प्रत्येक सरकारी आस्थापनाने मराठी भाषा दिन जोरात साजरा करायला हवा होता. परंतु, ठाण्यात असं कुठेही दिसलेलं नाही किंवा महाराष्ट्रात दिसलेलं नाही. बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्या की यांना मराठी आणि मराठी माणूस आठवतो. मराठी भाषा दिन महाराष्ट्र शासनानेच जाहीर केलाय, त्याची जाण या लोकांना नाहीये का? आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडून आयोजित करणं आवश्यक होत. असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झालेले नाहीत. यावरून एक गोष्ट कळते सरकारला मराठी भाषेच वावड आहे.
जर उद्या सकाळपर्यंत जीआर मागे घेतला नाही तर उद्या सकाळी पुन्हा आम्ही येऊन बसू, उद्या यांना पुन्हा यांची जागा आम्ही दाखऊन देऊ. पण हे परिपत्रक मागे घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण हजारो, शेकडो कर्मचाऱ्यांच यात नुकसान होणार आहे. याविरोधात सर्वांनी पत्रक द्यायला पाहिजे, तुम्हाला जर मराठीवर प्रेम आहे, तुम्हाला जर मराठीचा अभिमान आहे तर प्रत्येक पक्षाने पत्र दिल पाहिजे, प्रत्येक पक्षांनी यांना येऊन जाब विचारला पाहिजे कि यांनी हा निर्णय का घेतला? या महानगरपालिकेला लाज कुठे होती, आधीच यांनी भ्रष्टाचार करुन करुन लाज विकून खाल्ली आहे, आत्ता सांगतात यांच्याकडे पैसे नाहीत मग पैसे केले काय, महापालिकेच दरवर्षी ३/४ हजार कोटींच बजेट तुम्ही आम्हाला दाखवता त्याच करता काय? असे सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्तित केले आहेत.
हे ही वाचा:
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन
Follow Us