आमदार अपात्रतेच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा चेंडू हा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. अशात या सुनावणीचं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. उद्यापर्यंत (30 ऑक्टोबर) हे नवं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायलयाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्लीत जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.
दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची (Tushar Mehta) भेट घेणार आहेत. आमदार अपात्रताप्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी म्हटलंय. राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहे. हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे. राष्ट्रवादीच्या ८ आमदारांना नोटीस ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया आहे. याबाबत छाननी झालेली आहे त्यानुसार नोटीसा दिलेल्या आहेत वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे. तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन.
या अगोदर नार्वेकरांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याशी देखील चर्चा केली. विधानसभा आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याने सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना दोन वेळा अत्यंत कठोर शब्दांत फटकारलं आहे. या सुनावणीचे वेळापत्रक 30 ऑक्टोबरला सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि दोन महिन्यात निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :
आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)
संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…