९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर खळबळजनक आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात ठाकरे गट पेटून उठला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषेदेत नीलम गोऱ्हे यांच्यावर शब्दांचा पलटवार केला आहे. नीलम गोऱ्हे यांना मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलावण्यात आले होते. साहित्यिक म्हणून त्यांचे काय योगदान आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केले.
संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविषयी बोलताना ‘निर्लज्ज बाई’, ‘नमक हराम’ असा केला. तसेच महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन भरवला आहे का दिल्लीमध्ये ? असा सवालही राऊतांनी केला. हे जे साहित्य महामंडळ आहे, त्यांच्याकडे खंडण्या घेऊन संमेलन भरवत आहेत. मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये दिले की २५ लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचे काम करतात, कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात ते सतरंज्या उचलायला असतात, असा टोला संजय राऊत यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांच कालच वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. ज्या घरात तुम्ही खाल्लं, आमदार झाल्यात. मला आठवत आहे की बाळासाहेब ठाकरे बोलले होते ही बाई कोण आणली तुम्ही पक्षांमध्ये, कुठलं ध्यान आणलं आहे पक्षात आपल्याला शिव्या घालणारं. काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या. चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. त्या बाईंचं कर्तृत्व काय? विधान परिषदेतला हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यात महानगरपालिकेत आमचे गटनेते होते. अशोक हरनाळे त्यांची मुलाखत घ्या, त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचा प्लानिंग डीपी सुरू होतं. तेव्हा कोणा कोणाच्या नावावर या बाईने कोट्यावधी रुपये गोळा केले, गटनेते अशोक हरनाळे यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सडीज प्रकरण काय आहे ते त्यांना कळेल”, असा खुलासा संजय राऊतांनी केला.