महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला आहे. प्रचंड बहुमत मिळूनही महायुती पुन्हा सत्तेत आली असून सर्वात जास्त जागा जिंकून भाजप सर्वात मोठा भाऊ ठरला आहे. तरीही राज्याला अद्याप नवा मुख्यमंत्री मिळालेला नसून त्यावर खलबत सुरु आहे. दिल्लीत भाजपचे केंद्रीय नेते आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या, पण अजूनही कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल अशा शक्यता वर्तवल्या जात असतानाच आता दुसरीकडे आणखी एका नावाची चर्चा सुरु झाली होती. ते नाव म्हणजे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत असतानाच स्वतः खासदारांनीच स्पष्ट उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री पदावर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनीच ट्विट करत उत्तर दिले आहे. मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. समाज माध्यमांतून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची होणारी चर्चा निरर्थक आणि कलोकल्पित आहे, असं मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
‘आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्त्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचे पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि संसदीय मंडळात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात चर्चा अर्थहीन आहे, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंची चुप्पी अन् भाजपला ताप ! शिंदेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ?
शिंदे गटातील ‘या’ ४ नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा विरोध, Eknath Shinde काय भूमिका घेणार?