महायुतीची उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव येथे प्रचार सभा घेतली. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. म्हणूनच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.
जळगावमधील प्रचारसभेत अमित शाह म्हणाले की, “आपल्याला येण्यास उशीर झाला. त्याबद्दल माफी मागतो. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या महायुती सरकारला विजयी करा. महाराष्ट्राला देशातील एक नामावर राज्य बनविण्याचे स्वप्न आहे. शरद पवार , उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र राहुल गांधी हे सावरकर यांचा विरोध करत आहेत, तुम्ही त्यांना समर्थन देणार का? राहुल गांधीना सावरकरांबद्दल चांगलं बोलायला लावा, असे आव्हान उद्धव ठाकरेंना दिले. तसेच राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंबद्दल चांगलं बोलतील का? असा प्रश्नही त्यांनी या सभेत उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, सत्तेच्या भुकेने महाविकास आघाडी अंध झाली आहे. पवारांसारख्या नेत्यांनी राम मंदिर अडकवून ठेवलं. मोदींनी पाच वर्षात राम मंदिराचे काम सुरु केले. यंदा ५५० वर्षानंतर दिवाळी अयोध्येत साजरी केली. औरंगाबादच्या नामांतराला देखील मविआने विरोध केला. कलम ३७० हटवण्यासदेखील मविआने विरोध केला होता. वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणेला देखील महाविकास आघाडीने विरोध केला. वक्फ बोर्ड कायद्यात बदल करायचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलंय. मविआ सत्तेत आली तर ते वक्फ बोर्डाच्या बाजूने निर्णय घेतील, असेही ते यावेळी बोलले.
आमची युती महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहोत. ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. म्हणूनच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची मर्यादा ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. आरक्षण द्यायचे असेल तर आदिवासींचे, गरिबांचे आरक्षण कमी करावे लागेल, हे तुम्हाला मान्य आहे का? स्वातंत्र्यानंतर ३७० हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे.
हे ही वाचा:
अमित शाहांची शिंदे, फडणवीस, पवारांसोबत बंद दाराआड चर्चा, बैठकीत काय ठरलं?
परांडा विधानसभा मतदारसंघात Sharad Pawar म्हणाले, “मी काय म्हातारा…”