जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टररेटची चौकशी करण्यात यावी. त्यांच्याकडे बनावट डॉक्टरेट आहे. त्याची चौकशी करण्यात यावी. आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. आता युद्धाला सुरुवात झाली आहे. असा इशारा ही नजीब मुल्ला यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषद बोलतांना दिला.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या अभिजीत पवार यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाप्रसंगी घेतल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी अजित पवार तसेच नजीब मुल्ला यांच्यावर विविध आरोप केले होते. या आरोपांचे खंडन करण्यासाठी शुक्रवारी सकाळी नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना नजीब मुल्ला म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड यांचे धमकावण्याचे काम आहे. त्यांनी अभिजित पवार यांच्या पत्नीला देखील धमकवले. बऱ्याच वर्षांपासून मी शांत होतो. खानदानी असल्याने आम्ही खालच्या स्तरावर जाऊन बोलत नाही. माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर आव्हाड यांनी खोटे आरोप केले. अभिजित पवार पक्षात येत होते. मात्र, माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता. अभिजित पवार यांनी आणि बेकायदेशीररित्या पैसे कमावले आहेत. याबाबत चौकशी करावी याकरिता आम्ही आयकर विभाग आणि सर्व एजन्सीला कारवाई करण्याचे पत्र देणार आहोत. त्यांना अभिजित पवार यांनी कुठून पैसे कमावले त्याचे सर्व पुरावे आम्ही सादर करणार आहोत,” अशी माहिती नजीब मुल्ला यांनी दिली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टररेटची देखील चौकशी करावी. ती बनावट डॉक्टरेट आहे. त्याची चौकशी करावी याकरिता आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहे. असेही नजीब मुल्ला यांनी सांगितले. सूरज परमार प्रकरणामध्ये कोणी पैसे घेतले ? आणि बळी मात्र नजीब मुल्ला झाला. असा आरोपही मुल्ला यांनी यावेळी बोलतांना केला. केवळ जितेंद्र आव्हाड यांना वाचवण्यासाठी नजीब मुल्ला यांचा बळी गेला, असे मुल्ला यांनी सांगितले. मला खुनी म्हणत आहेत. पण आव्हाड यांच्या संदर्भात अनेक पुरावे माझाकडे आहेत, असा दावा ही मुल्ला यांनी केला. माझ्याकडे अनधिकृतरित्या कमवलेले पैसे नाहीत, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी बंगला कसा मिळवला? असा सवालही मुल्ला यांनी उपस्थितीत केला. आता युद्धाची सुरुवात झाली आहे. आव्हाड यांच्या बाबतचे अनेक पुरावे बाहेर काढणार, असे मुल्ला म्हणाले. अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी जितेंद्र आव्हाड सोडत नाही. अभिजीत पवार पलटूराम आहेत. पुन्हा जितेंद्र आव्हाड कडे गेला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी या पत्रकार परिषद बोलताना केला.
गणेशोत्सवासाठी POP आणि उंच मूर्तींना बंदी; मुंबई महानगरपालिकाकडून परिपत्रक जारी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.