Friday, April 19, 2024

Latest Posts

वांद्रे- वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचं नाव द्या, देवेंद्र फेडणवीसांनी केली मागणी

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावर राजकारणात नवा वाद सुरु होणार की काय? अशी शंका निर्माण होत आहे. कारण सावरकरांच्या नावाने काही दिवसांपूर्वी राहुल गांधी ने वक्तव्य केले होते आणि त्यामुळे राजराणात वादंग निर्माण झाले आणि त्यानंतर अनेक ठकाणी मोर्चे,आंदोलने काढण्यात आली.

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावर राजकारणात नवा वाद सुरु होणार की काय? अशी शंका निर्माण होत आहे. कारण सावरकरांच्या नावाने काही दिवसांपूर्वी राहुल गांधी ने वक्तव्य केले होते आणि त्यामुळे राजराणात वादंग निर्माण झाले आणि त्यानंतर अनेक ठकाणी मोर्चे,आंदोलने काढण्यात आली. काही ठिकाणी तर सावरकरांविषयी बोलणाऱ्या लोकांना चांगलाच समाज मिळावा म्हणून सावरकर यात्रा काढण्यात आली. त्यामुळे आता राजकारणात स्वातंत्रवीर सावरकरांच्या नावावर राजकारण करण्यात आले. आता देवेंद्र फडणवीस यांनी १३ मार्च रोजी पात्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी अशी विनंती देखील केली होती. त्या पत्राद्वारे कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. यांच्या मुद्द्यावरून पुन्हा भाजप आणि काँग्रेस आमने सामने असताना आता पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा गाजू शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या कडून करण्याता आली आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठा समाजबांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तर मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. आणि वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणखी दोन मागण्या पूर्ण होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. पहिल्यांदाच या ठिकाणी संभाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. संभाजी महाराज यांची 366 वी जयंती असल्याने या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे आणि त्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी बोलताना मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’ नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! १६ मार्च २०२३ रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे. असे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : 

गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंबद्द केले मोठे वक्तव्य

कर्नाटकातील निवडणुकांवर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात जुंपली शाब्दिक चकमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss