spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

मतदानानंतरच्या वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा, नाना पटोलेंची निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारणा

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत.

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवून केली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २० नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% मतदान झाले होते. दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी ६६.०५% होती. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत १.०३% ची तफावत कुठून आली? एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली? मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर व चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनातच शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे या पत्रात नमूद केले आहे.

हे ही वाचा:

Time Maharashtra आयोजित Strawberry With CM कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

स्ट्रॉबेरी पिकाला अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील – CM EKNATH SHINDE

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss