spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

गुजराती दरोडेखोरांच्या भाजपा युतीला सत्तेतून खाली खेचा: Nana Patole

“भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या दैवतांचा पावला पावलावर अपमान करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा रामदास स्वामी मोठे असल्याचे जाहीर सभेत सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, आमच्या दैवतांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. अमित शाह यांचा निषेध करत ज्या गुजराती दरोडेखोरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्या त्या भाजपा युतीला सत्तेतून खाली खेचा,” असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेस मविआचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्यासाठी प्रचारसभा घेतली, यावेळी नाना पटोले म्हणाले की, “भाजपा युती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आणि गुजरातच्या दरोडेखोरांनी महाराष्ट्राची प्रचंड मोठ्या प्रमाणात लुट केली. महाराष्ट्राची या दरोडेखारांच्या हातून सुटका करण्याची वेळ आता आली असून स्वाभिमानी जनता यावेळी त्यांना त्यांची जागा दाखवेल. नरेंद्र मोदी १० वर्ष पंतप्रधानपदावर होते आता ११ वे वर्ष सुरु झाले पण नाशिकच्या सभेत त्यांना बटेंगे तो कटेंगे म्हणावे लागते एवढा कमजोर पंतप्रधान भारताने आजपर्यंत पाहिला नाही.”

“भाजपा सरकारच्या काळात कापूस, कांदा, सोयाबीनला भाव नाही त्यावर पंतप्रधान किंवा भाजपाचा एकही नेता बोलत नाही. खतांचे भाव वाढले, बियाणांचे भाव वाढवले, शेतकऱ्यांच्या साहित्यावर जीएसटी लावला व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. सोयाबिनचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे. कापसाला भाव नाही आणि दुसरीकड़े मात्र महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले व आता भाजपामध्ये गेलेल्या नेत्याच्या पत्नीच्या हिऱ्यांची किंमत ६ महिन्यात ७६ लाखावरून ९६ लाख रुपये झाली. हिऱ्यांच्या किमीत सहा महिन्यांत वाढल्या पण कापूस, कांदा व सोयाबीनच्या किंमती मात्र वाढत नाहीत,” अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी, पंतप्रधान आहे पळणारा चित्ता…

PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss