Friday, April 26, 2024

Latest Posts

स्नेहल जगतापांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे नाना पटोले उद्धव ठाकरेंवर नाराज…

महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. महाडमध्ये ६ मे ला जेव्हा शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. महाडमध्ये ६ मे ला जेव्हा शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु ठाकरे गटाने जगताप यांना पक्षात प्रवेश दिल्याने महाविकास आघाडी गटातला ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष हा मात्र उद्धव ठाकरेंवर नाराज आहे.

स्नेहल जगताप या गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेत (ठाकरे गट) जाण्यास इच्छूक होत्या. सहा महिन्यांपूर्वी जगताप यांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन ठाकरेंची भेट देखील घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना विनंती केली की, जगताप यांना पक्षात प्रवेश देऊ नये. त्यामुळे बरेच महिने हा प्रवेश रखडला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा पक्षप्रवेश पूर्ण झाला. मुळात काँग्रेसचे माणिकराव जगताप (स्नेहल जगताप यांचे वडील) या मतदार संघातून निवडणूक लढत होते. आता स्नेहल जगताप या इथल्या उमेदवार असतील. उद्धव ठाकरे सध्या ४० बंडखोर आमदारांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या आमदारांना पर्याय शोधत आहेत. खरंतर भरत गोगावले महाड मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेचे आमदार असले तरी सध्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गोगावले यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करता यावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना पक्षात प्रवेश दिला आहे.

या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याबाबत म्हणाले, आम्ही आधीच या संबंधी उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं होतं की हे करू नका. पण तरी त्यांनी यावर विचार न करता स्नेहल जगताप यांचा शिवसेना गटात पक्ष प्रवेश करून घेतला. मात्र यावर नाना पटोले याना अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे.असे त्यांचे मत पडले. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जाईल. अशी माहिती देखील नाना पटोले यांचयकडून देण्यात आली आहे. महाडची जागा काँग्रेसची आहे आणि आम्ही ती जागा लढणार होतो असे देखील मत यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केले होते.

हे ही वाचा : 

मनसेने आधीचे ट्विट का डिलीट केले ?

असदुद्दीन ओवैसींची खोचक टीका; ‘द केरला स्टोरी’वर मांडली भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss