राज्यात सर्वांचे लक्ष आता सत्तास्थापनेकडे लागले आहे. महायुतीची सत्तास्थापन होणार आहे. नव्या सरकारची शपतविधी ५ डिसेंबरला होणार आहे असल्याची माहिती आहे. महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर काँग्रेस हायकमांडने मोठा निर्णय घेतला येऊ आहे.
काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे…
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि तो अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यानंतर तुरंत नाना पाटोले हे दिल्लीला रवाना झाले होते आणि त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना पाटोले यांनी पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे म्हंटले जात आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र नाना पटोले यांचा राजीनामा अद्याप काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाही. त्यामुळे नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस हायकमांडने काय म्हणाले..
आता काँग्रेस हायकमांडकडून नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. “ही राजीनामा देण्याची वेळ नाही. हा फक्त प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा नाही. हा निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचाही मुद्दा आहे. त्यामुळे आता तुम्ही राजीनामा देऊन मीडियासमोर चुकीचा नरेटिव्ह सेट करु नका. हायकंमाडच्या निर्णयाची प्रतीक्षा करा. प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहा. विधानसभेच्या पराभवाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल”, असे काँग्रेस हायकमांडने सांगितले आहे.
नाना पाटोले प्रदेशाध्यक्षपदी कायम
तसेच काल काँग्रेसच्या मीडिया सेलने नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळून लावलं होतं. ‘नाना पटोलेंनी राजीनामा दिलेला नाही. यासंदर्भातल्या बातम्या असत्य असून त्या खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत’, असे काँग्रेसच्या मिडिया सेलकडून सांगण्यात आले होते. त्यातच आता काँग्रेस हायकमांडने दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय होईपर्यंत नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंची चुप्पी अन् भाजपला ताप ! शिंदेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ?
शिंदे गटातील ‘या’ ४ नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा विरोध, Eknath Shinde काय भूमिका घेणार?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.