Narendra Modi, Delhi : आज दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते उपस्तिथ होते. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेविषयी सांगताना, मराठीतहून राष्ट्रप्रेम दिसून येते. “मी मराठीतून विचार केला तर मला ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. ” माझ्या मराठीची बोलू, परि अमृताताशीची पैजा जिंके”, या त्यांच्या ज्ञानेश्वरांच्या ओळी आहेत.
आरएसएसची स्थापना करणारेही मराठीच होते. गोळवलकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक बीज रोवलं होतं, त्याचा आज वटवृक्ष झालाय. ते १०० वर्षापासून संघ चालवत आहे. माझ्यासारख्या अनेकांना आरएसएसने देशासाठी जगायला शिकवलं. संघामुळेच माझा मराठी भाषेशी संबंध आलाय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, मराठी साहित्यात देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला अतिशय मनापासून अभिवादन करतो. पवारांमुळे या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली. आजतर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही साहित्य संमेलनाचा दिवसही अतिशय चांगला निवडला.
या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, साहित्य संमेलन दिल्लीला आहे याचा आनंद आहे. मराठी माणूस झेंडा अटकेपार फडकवणारा आहे. तो दिल्लीत दिसतो, गुजरातमध्ये ही दिसतो. अखिल मराठी साहित्य महाराष्ट्राचे साहित्यिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला, तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.यासाठी नरेंद्र मोदींबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. पहिलं दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन झालं, त्याचं उद्धाटन पंडित नेहरुंनी केलेलं. त्यासाठी काकासाहेब गाडगीळांनी तयारी केलेली. नेहरुंनी त्या साहित्य संमलेनाचं उद्घाटन केलेलं, या साहित्य संमेलनाचं उद्घाटन नरेंद्र मोदींनं केलेलं. मला गुरुस्थानी असलेले यशवंतराव चव्हाण चांगेल साहित्यिक होते. मी ३० वर्षाहून अधिक काळ मराठी अस्मितेसाठी जे जे काही करता येईल, ते केलं म्हणून माझ्यावर स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. माझ्याकडे खंत व्यक्त केलेली, आतापर्यंत इतकी संमेलने झाले, पण फक्त चारच महिलांना अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. पण यावेळी एका महिला साहित्यिकाला हा मान मिळाला, याचा आनंद आहे.असे शरद पवारांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले.
Chhaava: अभिनेत्री Genelia Deshmukh कडून छावा चित्रपट फेम विकी कौशलचे तोंडभरून कौतुक
Follow Us