काही दिवसांपूर्वी नेते नरेंद्र राणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राम राम केला होता आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता नरेंद्र राणे यांचा पुन्हा परत अजित दादांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नरेंद्र राणे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या बंडखोरीने अजित पवार गटाला फटका बसेल असे संकेत होते. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला बळ मिळेल असे मानले जात होते. त्यावेळी सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले होते. आता त्यातील अनेक जण परतीची वाट धरत आहे.
सुनील तटकरेंची घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भेटीला नरेंद्र राणे, त्यांचेच भाऊ आणि दिनकर तावडे हे प्रदेश कार्यालयात पोहोचले. निवडणुकीपूर्वी मुंबई कार्याध्यक्ष पदी असणारे नरेंद्र राणे, जनरल सेक्रेटरी पदी असणारे विलास माने यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता निवडणूक संपताच पुन्हा राणे आणि त्यांचे समर्थक पदाधिकार्यांना परतीचे वेध लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
कधी होणार प्रवेश?
नरेंद्र राणे आणि त्यांच्या ४ सहकाऱ्यांचा पक्ष प्रवेश कधी होणार अशी चर्चा होत आहे. मात्र राष्ट्रवादी आणि नरेंद्र राणे यांच्याकडून याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. नरेंद्र राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षातून विरोध असल्यामुळे पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Narendra Modi : RSS मुळे माझा मराठीशी संबंध म्हणत, नरेंद्र मोदींनी केला मराठी भाषेचं कौतुक
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.