Tuesday, May 30, 2023

Latest Posts

Narhari Zirwal यांच्यावर राऊतांनी केलेला टीकेवर अब्दुल सत्तारांचा टोला

अखेर आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. तर आज निकाल असून नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल आहेत अश्या देखील चर्चाना उधाण हे आले होते. यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी एक ट्विट करत खोचला टोला हा लगावला होता. संजय राऊतांच्या टिकेवरून अब्दुल सत्तारांनी चांगलाच टोला हा लगावला होता.

 

संजय राऊत यांच्या टीकेला अब्दुल सत्तर यांनी पार्टीऊतर हे दिले आहे. “नरहरी झिरवळांचा खेळ आता संपला आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. जर आज विधानसभेचे अध्यक्ष नसते, तर कदाचित १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झिरवळ यांच्याकडे आला असता. त्यावेळी नरहरी झिरवळ यांनी त्यांचं काम केलं, यापुढे राहुल नार्वेकर त्यांचं काम करतील”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या लंडन दौऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली. “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय येणार आहे, हे राहुल नार्वेकर यांना माहिती आहे. त्यामुळे ते निवांत आहे आणि लंडनला गेले आहेत. राहुल नार्वेकर हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल, त्यानुसार काद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील”, असे ते म्हणाले.

काही महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून काढता पाय घेतला. आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं. त्यावेळी विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना अपात्रतेची नोटिस बजावली. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा दिला आणि त्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Latest Posts

Don't Miss