देशमुख कुंटुंबीयानी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण काही पुरावेदेखील दिले आहेत. महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली म्ह्णून देशमुख कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की,” भगवान बाबाच्या गादीवर बसलेले महंत नामदेव शास्त्री यांना कोणीही भेटू शकते, भगवानगड काही कुठल्या एका समाजाचे नाहीत सर्व बहुजन समाजाचा भगवानगड आहे, संतोष देशमुख कुटूंबीयांनी काही पुरावे शास्त्री यांना दिले असतील तर त्यात तथ्य असेल तर येणाऱ्या काळात आपल्याला काय होईल ते दिसेल”, असं ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी म्हटलंय.
पुढे ते म्हणाले की,”नामदेव शास्त्रीनी धनंजय मुंडेची फक्त बाजू घेतली, आरोपीची बाजू घेतलेली नाही, मीडिया ट्रायलद्वारे धनंजय मुंडेना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्यामुळे शास्त्रीनी धनंजय मुंडेची बाजू घेतली असल्याची कबुली वाघमारे यांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे विषयी पुरावे असतील तर मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यामंत्र्याकडे द्या, ते ऐकत नसतील तर न्यायालय, सीबीआय आणि गृहविभाग आहे, त्याच्याकडे पुरावे देऊ शकता. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून फक्त राजकारण सुरु आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याच षडयंत्र आहे, जातीवादी सुरेश धस आणि बंजरंग सोनवणे या लोकांचे कटकारस्थान आहे, महंतानी धनंजय मुंडेची बाजू घेणे हें काही मोठी गोष्ट नाहीये, महंत नामदेव शास्त्री योग्य बोलले असून चुकीचे काय बोलले ? नारायणगडावर जरागेंनी मेळावा घेतला, नारायणगडचे महंत हें जरागेंना वेळोवेळी भेटी घेतल्या सोबत फिरले ते दाखवित नाहीत, आणि ओबीसीचा एखादा गड आहे, त्या महंताना बदनाम करीत असतील ते चुकीचे आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया यांच्याकडून वारंवार होत आहे. सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांना अपेक्षाही आहे. यावर नवनाथ वाघमारे म्हणाले की, अंजली दमानिया सुपारीबाजबाई, यापूर्वी त्यांनी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या, आरोप करायचे आणि सेटलमेंट करणे हा व्यवसाय अंजली दमनियाचा झाला, धनंजय मुंडेकडून त्यांची सेटलमेंट झाली नसेल त्यामुळे मीडिया ट्रायलद्वारे त्यांच्यावर आरोप सुरु आहे, असा टोला नवनाथ वाघमारे यांनी अंजली दमानिया यांना लगावला आहे.
हे ही वाचा :
देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहे?- Sanjay Raut