राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे महायुतीच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांची काल रात्री (शनिवार, १६ नोव्हेंबर) सभा आयोजित करण्यात आली होती. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा ह्या दर्यापूर विधानसभेत विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नवनीत राणांची सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.
नवनीत राणा यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. खल्लार पोलीस ठाण्यावर धडक देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक करावी तोपर्यंत आम्ही ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका देखील घेण्यात आली होती. खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून आतापर्यंत ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार जणांना अटक करण्यात आली आहे. सभास्थळी काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने इशारे नवनीत राणांवर सुरू होते, असा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच, नवनीत राणांना मारण्याच्या धमक्या, त्यांच्या अंगावर थुकण्याचा प्रयत्न, खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न झाला असल्याचा रोपही त्यांनी केला. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून नवनीत राणा यांनी यावरून प्रतिक्रिया दिली असून ‘त्यांची भाषा जर कापण्याची असेल तर आम्ही त्यांना तसेच उत्तर देऊ,” असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…