Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. अश्यातच प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनादेखील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागलेला आहे. प्रहार पक्षालादेखील एकाही जागेवर निवडून येता आले नाही. यावरून आता बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर भाष्य करत ‘माझ्या पराभवाचे श्रेय त्यांनी घेऊ नये,’ असा टोला लगावला आहे. यावर आता नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नवनीत राणा यांनी आज (गुरुवार, २८ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांना पराभव पत्कारावा लागल्यानंतर राणा दाम्पत्यांनी त्य्नाच्यावर सडकून टीका केली होती आता नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर देत, ‘जनता जनार्दनांची औकात काढणाऱ्यांना त्यांची औकात जनतेने दाखवून दिली,’ असा घणाघात केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा यावेळी म्हणाल्या, ” बच्चू काडूना हरवण्यात माझे श्रेय नाही आहे. पण माझ्या जनतेने बदला घेतला. दादा आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतं.. जनता जनार्दनांनी औकात काढणाऱ्यांना त्यांची औकात जनतेने दाखवून दिली. वयाने, अनुभावाने मी तर लहान आहे. मी माजी सैनिकांची मुलगी आहे म्हणून माझी औकात काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे,” असे ते म्हणाले.
संजय राऊत यांच्याबाबत वक्तव्य करत त्या म्हणाल्या, “मैंने सुना है समय देख के बहुत लोग बदलते है पर ऐसे लोगोके भी सुर बदलते है ये मैंने पहेली बार ही सुना है… रामजी जसे भाजपचे एकट्याचे नाहीत असे म्हणत आहे तसे बाळासाहेब एका कुटुंबाचे नाही ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहे. आम्ही महायुती सरकार मध्ये आहे सर्व मिळून लढणार,” असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
शिंदे गटातील प्रबळ दावेदार Devendra Fadnavis यांच्या भेटीला…
Eknath Shinde यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री ?